रुणानुबंध हा फक्त जन्माचा नव्हे, तर आत्म्यांच्या निखळ प्रेमाचा धागा आहे. आई-बाबांच्या आठवणींना शब्दरूप देत, हा संदेश त्यांच्या प्रेमाचा एक अंश आहे – जिथे ते आहेत, तिथून मला आशीर्वाद देत आहेत.
रुणानुबंध हा फक्त देणं-घेणं नाही,
तो जन्मोजन्मीचा एक गुंता आहे काही।
पूर्वस्मृतींच्या पायवाटेवर,
आपण पुन्हा पुन्हा भेटत असतो,
कधी पालक, कधी मूल होऊन,
एकमेकांच्या ऋणातून मोकळे होत असतो।
आई-बाबा म्हणायचे – “हा जन्म शेवट नाही,
आपण पुन्हा भेटू कुठेतरी, कधी काही।“
ते गेले, पण आपलं नातं उरलंच,
कारण रुणानुबंध संपत नसतो सहजच।
तुला आठवतंय का, लहानपणी पडल्यावर,
आईने किती मऊसूत कुरवाळलं होतं?
बाबांनी खांद्यावर बसवून,
आकाश दाखवलं होतं?
तेव्हा ते फक्त काळजी घेत नव्हते,
ते मागच्या जन्माची हळवी परतफेड करत होते।
आता त्यांचा देह नाही, पण त्यांचं अस्तित्व आहे,
तुझ्या हृदयाच्या गाभ्यात, अजूनही ते लपलं आहे।
ते तुझ्या आठवणींमध्ये, तुझ्या हसण्यात आहेत,
तुझ्या प्रत्येक स्वप्नात, तुझ्या संग आहेत।
त्यांनी वेदना सोसल्या, पण का?
कारण या जन्माचा ऋण असं लिहिलं होतं का?
मग त्यांचा दुःखाने शेवट कसा?
उत्तर एकच – ते प्रेमाचं सत्त्व होतं।
आई-बाबा जाणून होते,
की हेही एक चक्र आहे,
तू मोठा होशील, आपली वाट चालशील,
आम्ही तुझ्या सावलीत, गारवा होऊन राहू।
तू रडू नकोस, आम्ही कुठेही नाहीसे झालो नाही,
तुझ्या हृदयात, तुझ्या प्रत्येक श्वासात आहोत।
तू पुढे चल, आनंदाने जग,
आम्ही तुझ्या यशाच्या टाळ्या वाजवत आहोत।
तुझा वाढदिवस आनंदाने साजरा कर, बाळा,
कारण तू म्हणजेच आमचं अवघं जग।
रुणानुबंध:
Published inKavita (Poems)
Be First to Comment