In her final moments, I sat beside her — words failed, but love spoke.I whispered, “Go, Maa…” and in that silence, she heard me — with her eyes, her breath, and her soul.
त्या खोलीत सगळं थांबलं होतं,वेळही, श्वासही, माझं मनही.फक्त मशीनचा आवाज चालू होता,आणि तुझ्या डोळ्यांत एक शांत समुद्र.
मी हळूच म्हणालो —“जा आई, बाबा बोलवत असतील जा,थांबू नको, यातना सोड…”ते शब्द तोंडातून निघाले, पण हृदय फाटून गेलं.
क्षणभर काहीतरी हललं —तुझं शरीर, ती नळीतील पाणी,तो अचानक वाढलेला दाब,जणू तू म्हणालीस — “ऐकलं मी, रे बाळा…”
त्या क्षणी मला कळलं,तू गेलीस नाहीस,तू फक्त सुटलिस —या जगाच्या बंधनातून,आणि माझ्या हातातून… प्रकाशाकडे.
आजही त्या क्षणाचा आवाज मनात घुमतो,पण आता त्यात वेदना नाहीत,फक्त एक सत्य आहे —की प्रेम कधी मरत नाही,ते फक्त रुपांतरित होतं —एक शेवटच्या श्वासात, एक शांततेत,आणि एका मुलाच्या डोळ्यांत —जो अजूनही तुझ्या स्पर्शात जगतो.
#आई #बाबा #आईबाबांचीआठवण #प्रेमाचाश्वास #अंतिमसंवाद #मातृप्रेम #पितृआशीर्वाद #मनशांतनाही#मराठीकविता #भावनांचीकविता #RishabhPataitPoetry #शब्दांतशांतता #मनाचेधागे #हृदयस्पर्शीकविता #SannatechaShwas #KavitaMarathi#प्रेमअमरआहे #जिथेसर्वशांततेत #आठवणीतलेदेव #आईबाबाआहेतयेत #प्रकाशाचाप्रवास #आत्म्याचेशब्द
Be First to Comment