Introduction:
ही कविता मी आईसाठी लिहिली आहे. ती गेल्यापासून मनात एकच विचार येतो — तिने कधी मला एकटं सोडलं नाही, पण शेवटच्या वेळी मी तिला एकटं ठेवलं. आज जेव्हा मीही घाबरतो, तेव्हा तिची आठवण माझ्या भीतींना थांबवते… कारण अजून वेळ नाही……..
“अजून वेळ नाही…”
अंधार गडद झाला की — तुझा चेहरा उजळतो,
हवेतील गंध अजूनही तुझाच वाटतो.
कधी काळी तू म्हणायचीस — “घाबरू नको रे…”
आज मीच ते शब्द कुजबुजतो, माझ्याच लेकराला धरून.
तू कधीच मला एकटं ठेवलं नाही,
अंधार आला तरी हातात तुझं उबदार बोट असायचं.
आता तोच अंधार पुन्हा दार ठोठावतोय,
पण यावेळी तू दुसऱ्या जगात आहेस…
आज मीही कधी कधी डोळे मिटतो,
तुझ्या ओंजळीत डोकं ठेवावंसं वाटतं;
पण हातात तिचं छोटं बोट आहे —
म्हणून मागे फिरू शकत नाही.
आज मीही घाबरतो,
हृदयात तीच धडधड,
डोळ्यात तोच दाट धूर,
पण माझ्या हाताला एक छोटं हात आहे —
जिला अजून स्वप्नं रंगवायची आहेत.
मी पळू शकत नाही,
कारण माझ्या भीतीनं तिच्या जगात अंधार होईल.
म्हणून आई-बाबा,
तुमच्या जगात माझ्या भीतीला थोडं थांबवा ना…
सांगा तिला —
“तो अजून तयार नाही यायला…”
जेव्हा ती मोठी होईल,
तिच्या डोळ्यांत आई, तुझं बळ दिसेल;
तेव्हा मीही शांतपणे तुझ्याकडे धाव घेईन,
तुझ्या कुशीत पुन्हा मूल होईन…
पण तोवर,
आई, माझ्या भीतींना सांग —
“अजून वेळ नाही… अजून वेळ नाही…”
आई #माय #MarathiPoem #अजूनवेळनाही #MotherAndSon #EmotionalMarathiPoem #HeartfeltPoetry #LoveBeyondLife #MarathiLiterature #PoetryOfLife #MemoriesOfMom #SoulfulLines #Parenthood #LoveAndLoss #FeelingsInWords #LifeAndLove #RishabhPataitPoems #MarathiWriter #EmotionsUnfolded #मुलगा #आईचीआठवण #मराठीकविता #MarathiEmotions #PoetryForMom
Be First to Comment